लोकशाही की हुकूमशाही?

0

 

विरोधी पक्ष(इंडिया आघाडी) त्याचा प्रचारात सतत उल्लेख करतो की २०२४ ची लोकसभेची निवडणूक ही देशासाठी महत्वाची आहे कारण या निवडणुकीत देशात लोकशाही नांदणार की हुकूमशाही येणार हे ठरणार आहे, पण हे खरचं शक्य आहे की फक्त प्रचाराचा एक भाग आहे?
इंडिया आघाडीने महागाई, बेरोजगारी, हुकूमशाही, भ्रष्टाचार यांसारखे मुद्दे मांडले. काही मुद्दे हे लोकांना पटणारे आहे जसे की भ्रष्टाचार, बेरोजगारी. भाजपने राजकीय तडजोडी करत अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना सरळ भाजपात प्रवेश दिला किंवा आडमार्गाने युतीत असेलेल्या पक्षात शामिल करवून मंत्रीपद दिले. यां किंवा यांसारख्या काही भुमिका न पटणा-या जरी असल्या तरी दुसरा पर्याय इंडिया आघाडी देऊ शकेल? आज देशात २०१४ नंतर काही चुकिचे तर काही बरोबर धोरण राबवली गेली आहे ज्यांच चांगले वाईट परिणाम डोळ्यांनी दिसत आहे. पण २०१४ नंतर देशात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यात, अनेक मोठ मोठे महामार्ग बनवून देशांतल्या महत्वाच्या शहरांना जोडण्यात काम सूरू झालं जेणे करून लोकांन सोबतच औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा झाला. बरीच परदेशी प्रकल्प सुध्दा देशात आले किंवा येऊ घातले आहे. नोक-या जरी तुलनेने कमी उपलब्ध असल्या तरी अनेक छोटे छोटे उद्योग देशांत सूरू होऊन तरूणांना स्वयंरोजगारासाठी मोदी सरकार कडून सोई दिल्या जात आहे. त्यामुळे २०१४ च्या आधीच्या भारतात आणि २०१४ च्या नंतर च्या भारतात बराच फरक झाला आहे. भाजपाचे काही मुद्दे न पटणारे असले तरी त्याकडे सध्या डोळेझाक करण्याशिवाय पर्याय नाही.
आता इंडिया आघाडी जी लोकशाही वाचवायला या निवडणुकीत उतरली आहे ती मुळात स्वतः लोकशाही किती मानते? इंडिया आघाडीत शामिल असलेले पक्ष एकमताने आज पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहिर करून निवडणुकीला समोर जाऊ शकत नाही मग कोणती लोकशाही टिकवायची भाषा हे करत आहे?
खरच लोकशाही वायवायची आहे की त्यांचे स्वतःचे संपणारे अस्तित्व टिकवायची धडपड आहे?
आजची परिस्थिती पाहतां कॅांग्रेस सारखा सर्वात जुना आणि मोठा पक्ष सुध्दा महत्वाच्या राज्यात तिथल्या प्रादेशिक पक्षा पेक्षा कमी जागा घेऊन निवडणुकीला समोर जातो आहे अशा वेळी कॅांग्रेस पक्ष इंडिया आघाडी जिंकल्यावर खरच राहूल गांधींना पंतप्रधान करी यासाठी सर्व घटक पक्षांचे एकमत करू शकेल? किंवा हेच बाकी इंडिया आघाडीच्या बाकी घटक पक्षांच्या बाबतीत सुध्दा होईल कारण याआघाडीत सर्वच मोठे पक्षाचे नेते “लोकशाही वाचवायच्या” नावाखाली पंतप्रधान पदाच्या खुर्ची मिळवण्याचे स्वप्न रंगवत आहे आणि वेळ पडल्यास ही सर्व घटक पक्ष आमचाच पंतप्रधान हवा या किंवा इतर काही अटी शर्ती टाकून स्वतः चा स्वार्थच साध्य करणार आहे.
त्यामुळे एक गोष्ट निश्चित की २०२४ ची लोकसभा ही देशासाठी महत्वाचीच आहे. कारण ही निवडणुक देशाला विकसनशील देशा कडून विकसीत देश करायला होत आहे आणि म्हणून देशांत कणखर नेतृत्वाचीच गरज आहे जी इंडिया आघाडी पुर्ण करू शकत नाही. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात २०२४ नंतर हुकूमशाही आली तरी चालेल पण इंडिया आघाडीच्या “नेतृत्वाच्याच” लढाईत देश १०-२० वर्ष मागे गेला तर ते येणा-या पिढीला परवडणारे नाही.

अनिरूध्द राम निमखेडकर.