बदलीसाठी कर्मचाऱ्यास शरीरसुखाची मागणी

0

अमरावती: प्रतिनियुक्तीवर बदलीसाठी एका महिला कर्मचाऱ्यास शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा संतप्त प्रकार उघडकीस आला असून अमरावती पोलिसांनी तक्रारीच्या आधारे शासकीय अधिकार्यावर विनयभंग तसेच अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याचे नाव मारोतराव राठोड (रा. खामगाव) असून त्याच्याविरुद्ध नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कर्मचारी महिलेला प्रतिनियुक्तीवर अमरावती कार्यालयात बदली हवी होती. त्यामुळे त्यांनी १८ ऑक्टोबर रोजी आपल्या सहआयुक्तांच्या सुचनेनुसार सहकर्मचाऱ्यांसह आरोपी मारोतराव राठोड याच्या कक्षात जावून त्याला प्रतिनियुक्तीबाबत विनंती केली. त्यावेळी राठोड फारसा काही बोलला नाही. मात्र त्यानंतर त्याने तिला अत्यंक्ष आक्षेपार्ह असा व्हॉटसॲप संदेश पाठविला. त्यानंतर त्याने तिचा सतत पाठलाग करुन शारीरिक संबंधाची मागणी केली. कर्मचारी महिलेने त्याने पाठविलेल्या व्हिडिओचे स्क्रिनशॉट देखील काढून ठेवले. मारोतराव राठोडच्या अशा विकृत वर्तनाची महिलेने त्यांच्या कार्यालयातील विशाखा समितीकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर महिलेने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान तो प्रकार घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्याला अटक होण्याची शक्यता आहे.