sanjay raut uddhav thackeray मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे, राऊतांना न्यायालयाचे समन्स

0

मुंबई Mumbai -शिवसेना  shivsena ठाकरे गटाचे sanjay raut uddhav thackeray  प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावला आहे. शिवसेनेचे खासदार Rahul Shewale राहुल शेवाळे यांच्या मानहानीप्रकरणी मुंबई न्यायदंडाधिकाऱ्यांकडून समन्स बजावण्यात आले असून दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामना या मुखपत्रात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याची तक्रार खासदार शेवाळेंनी केली असून न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणाचा तपास फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी खासदार शेवाळे यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुरावा म्हणून त्यांनी प्रसिद्ध झालेला मूळ लेख सादर केला आहे.