दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी २५ हजार मदत द्या-वडेट्टीवार

0

मुंबई-राज्य सरकारने कर्नाटकाप्रमाणे राज्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader Of Opposition Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. २०२१-२२ मध्ये अतिवृष्टीत चार लाख ७३ हजार हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली. आमच्या सरकारने मदत जाहीर केली, पण नंतर सरकार बदलले व केवळ सव्वालाख शेतकऱ्यांना मदत मिळाली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकार गंभीर नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केली.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात पूर्वी एक अलिबाबा आणि चाळीस चोर होते, आता दोन अलिबाबा आणि चाळीस चोर असल्याचे टीकास्त्र वडेट्टीवार यांनी राज्य सरकावर सोडले. जाती-पातीत भांडणे लावून तिजोरीची लूट करण्याचे एकमेव काम सध्या सुरू आहे, असल्याचे ते म्हणाले.