

डिसेंबर महिन्यात २ महत्वाचे उल्कावर्षाव,१ धुमकेतू आणि अनेक ग्रह-चंद्राची युती पाहण्याची संधि मिळणार आहे.२०२३ वर्षांतील ह्या शेवटच्या खगोलीय घटना राहणार असून खगोल निरीक्षकांना सुवर्ण संधी असेल.सर्वानी ह्या खगोलीय घटनांना अवश्य पाहावे असे आवाहन असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.
✨ १४ डिसेंबरला जेमिनिड उल्का वर्षाव
नोव्हेंबर महिन्यात एकूण ६ उल्कावर्षाव होत असले तरी जेमिनिड उल्कावर्षाव हा सर्वाधिक मोठा उल्कावर्षाव मानला जातो.खरं तर हा उल्कावर्षाव ४ ते १७ डिसेंबर पर्यंत दिसतो परंतु सर्वाधिक तासी १००-१३० उल्का ह्या १४ डिसेंबर ला दिसण्याची शक्यता असते. जेमिनी तारासमूहात हा उल्कावर्षाव कमी अधिक दरवर्षी दिसतो.पूर्वेला रात्री ८ वाजेपासून तर पहाटे पर्यंत जरी दिसत असला तरी उल्कावर्षावाचे सर्वाधिक प्रमाण रात्री १ ते २ वाजेपर्यंत दिसेल.अस्टेरॉईड ३२०० पॆथोम ह्या ग्रहिके मुळे हा उल्कावर्षाव दिसतो.खाली लेटून साध्या डोळ्याने पाहिल्यास चांगला उल्कावर्षाव दिसतो.द्विनेत्रीं/दुर्बीनीची गरज नसते.खगोल निरीक्षकानी अवश्य हा उल्कावर्षाव पहावा असे आवाहन स्काय वॉच गृप तर्फे करण्यात येत आहे.
💫 २३ डिसेंबर ला उर्सीड उल्कावर्षाव
हा उल्कावर्षाव १७-२३ डिसेंबर पर्यंत दिसत असला तरी सर्वाधिक उल्का २३ डिसेंबर ला दिसेल. उर्सा(Ursa Miner) मायनर तारा समूहात हा उल्कावर्षाव रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत पूर्व-उत्तर दिशेला दिसेल परंतु जास्तीत जास्त तासी २० उल्का दिसण्याची शक्यता आहे. हा उल्कावर्षाव 8P/Tattle ह्या धूमकेतू मुळे हा वर्षाव दिसतो.अवकाशातील दगड जेव्हा पृथ्वी च्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा घर्षणाने ते तापतात आणि एका रेषेत चकाक ताना दिसतात, त्यांना आपण तारा तुटणे असे संबोधित करतो.ह्यातील बहुतेक दगड राख होऊन जमीवर पडतात किंवा कधी उल्का रूपाने जमिनीवर शिल्लक आदळतात.
☄️ २५-२८ डिसेंबर ला धूमकेतू पाहण्याची संधी
संपूर्ण डिसेंबर महिन्यात 62P/Tsuchinshan हा धुमकेतू पूर्वेला पहाटेच्या आकाशात लिओ (Leo) तारा समूहात दिसणार आहे ,परंतु हा धुमकेतू २५ डिसेंबर ला पृथ्वी च्या सर्वाधिक जवळ(१.२७ अस्ट्रोनॉमिकल युनीट) अंतरावर असणार आहे आणि २८ डिसेंबर ला सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे.ह्याची तीव्रता 8 असेल.रात्री २ नंतर पहाटे सुर्यास्ता पर्यंत हा धुमकेतू द्विनेत्रीं आणि दुर्बिणीने पाहता येईल.साध्या डोळ्याने दिसणार नाही.
🌙🪐 ग्रह आणि चंद्राची युती
●१४ डिसेंबर ला चंद्र-बुध ग्रहाची युती
●१८ तारखेला चंद्र-शनी ची युती,
●१९ ला चंद्र-नेपचून युती (आस्ट्रेलिया येथून पिधान)
●२२ ला चंद्र-गुरू ग्रहाची युती दिसेल.
🪐 आकाशातील ग्रह दर्शन
★ संध्याकाळी सुर्यास्ता नंतर बुध ग्रह दिसेल
★ रात्री गुरू आणि शनी ग्रह दिसेल
★पहाटे मंगळ आणि शुक्र ग्रह दिसेल.
🌍 २२ डिसेंबर सर्वात लहान दिवस
२२ डिसेंबर हा विंटर सोलेस्टिस म्हणून मानल्या जातो हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते.ह्या वर्षी हा योग रात्री ८.५४ वाजता असेल.
वरील सर्व खगोलीय घटना नागरिक,अभ्यासक आणि निरीक्षकानी अवश्य पहाव्या असे आवाहान स्काय वॉच गृप,इंडिया ह्या खगोल संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे
*******
प्रा सुरेश चोपणे
अध्यक्ष
स्काय वॉच गृप,इंडिया
9722364473