Gondia News : गोंदिया रोडवर गोरठा येथे काळवीटाचा मृत्यू

0
Gondia News : गोंदिया रोडवर गोरठा येथे काळवीटाचा मृत्यू
death-of-an-antelope-at-gortha-on-gondia-road

अज्ञात वाहनाची धडक, वन विभाग आमगावकडून तपास सुरू

गोंदिया (Gondia) :- गोंदिया रोडवर गोरठा जवळ काळवीटाला अज्ञात वाहनाच धडकेत मृत्यू, वन विभाग आमगाव करीत आहे तपास गोंदिया रोडवर गोरठा गावा जवळ एका अज्ञात वाहनाने काळवीटाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काळवीट हा संरक्षित वन्यप्राणी असून, त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणे पर्यावरणीय दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आमगावच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृत काळवीटाला ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही घटना गंभीर मानली जात असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.सदर घटनेमुळे वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. वन विभागाने या भागात पेट्रोलिंग वाढवून अशा घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Gondia gov in

Gondia map

Zp gondia
Gondia famous for
Gondia places to visit
Gondia famous food
Gondia Pin Code
Gondia district Information