

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत. आमचे सरकार हे जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले आहेत. महायुती सरकारच्या कार्यकाळात 129 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, ज्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ आणि इतर योजनांतर्गत पायाभूत सुधारणा केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी आम्ही 1 रुपयांत पीक विमा योजना लागू केली, सौरऊर्जेवर आधारित योजनांना गती दिली आणि दिवसा वीज पुरवठा करण्याच्या योजना यशस्वीपणे अंमलात आणल्या. तसेच 7.5 एचपीपर्यंत वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील बीड व परभणी येथील घटनांवर सरकारने तातडीने कारवाई केली असून कायद्याचे पालन हे सर्वोच्च ठेवलं आहे. विरोधकांनी अधिवेशनाला विनोदी संबोधणे हा खरोखरच एक विनोद आहे. शेतकऱ्यांसाठी 5000 रुपये प्रति हेक्टरची मदत देण्यात आली असून 4,194 कोटी रुपये वाटप केले गेले आहेत. कांद्याच्या भावासाठी केंद्र सरकारकडे मागणी सुरू आहे आणि त्याबाबतही लवकर सकारात्मक निकाल अपेक्षित आहे.
आमचं सरकार हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आहे आणि आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू. असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.