

मुंबई (Mumbai)- मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जातेय.
74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी (DAWARKANATH SANZGIRI PASS AWAY)यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जातेय.
क्रिकेटमधील रुचीने संझगिरींमधला क्रिकेट समीक्षक घडला
दरम्यान, द्वारकानाथ संझगिरी यांनी खुमासदार क्रिकेट लेखन केलंय. त्यांची अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत. तसेच क्रिकेटवर त्यांनी अनेक कार्यक्रम केलेत. मराठी साहित्य आणि क्रिकेटमधील रुचीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. द्वारकानाथ संझगिरी हे पेशानं सिव्हिल इंजिनीअर होते. मुंबई महापालिकेत द्वारकानाथ संझगिरी हे उच्च पदावर कार्यरत होते. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अनेक दिग्गज मंडळीसोबत त्यांनी क्रिकेटमधील आठवणी, किस्से आणि प्रसंग यावर कार्यक्रम केलेत. त्यांच्या क्रिकेटवरील लेखणाला मराठी माणसांनी नेहमीच पसंती दिलीय. द्वारकानाथ संझगिरी यांच्या जाण्यामुळे शोक व्यक केला जातोय.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुःख व्यक्त केलंय. साहित्याच्या विविध प्रकारातून क्रिकेट जगताची ओळख प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीला करून देणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला, अशा भावनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्यात.