

नागपूर (Nagpur)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची अखेर तीन वर्षांसाठी फेरनिवड झाली आहे.
नागपुरातील स्मृती मंदिर परिसर रेशीमबागेत सुरू असलेल्या त्रैवार्षिक बैठकीत ही फेरनिवड झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर यासाठी रविवारी सकाळी नागपुरात पोहचले. बैठकीमध्ये सरकार्यवाह यांची निवड व तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर यासंदर्भात उत्सुकता आहे. संघाचे शताब्दी वर्ष आणि येत्या निवडणुकांच्या तोंडावर सरकार्यवाहपदाची धुरा महत्वाची आहे. सरसंघचालक डॉ मोहन भागवत (Sarsangchalak Dr. Mohan Bhagwat)यांनी होसबळे यांना शुभेच्छा दिल्या.