Dattaji Didolkar Birth Centenary Year Concluding Program:कार्यक्रमाच्‍या वेळेत बदल

0

Dattaji Didolkar (Dattaji Didolkar) Birth Centenary Year Concluding Program: श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर  (Dattaji Didolkar)यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम बुधवार, 7 ऑगस्ट 2024 रोजी होणा-या कार्यक्रमाच्‍या वेळेत अपरिहार्य कारणामुळे थोडा बदल करण्‍यात आलेला आहे.

रेशीमबाग येथील कवी सुरेश भट सभागृहात (Poet Suresh Bhat in the auditorium)सायंकाळी 6 वाजता होणारा हा कार्यक्रम अर्धा तास उशीराने म्‍हणजे 6.30 वाजता सुरू होईल.

या कार्यक्रमात सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत (Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat) अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही यांची उपस्‍थ‍िती राहील. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी राहणार आहेत.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्‍यात येणार असून शिक्षण क्षेत्रात उल्‍लेखनीय योगदान देणा-या संस्थेला ‘‘श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कार’’ प्रदान करण्‍यात येणार आहे.