

नागपूर : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘ महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर Dattaji Didolkar सन्मान सोहळ्याचे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राजभवन नागपूर येथे आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
लोढा म्हणाले की, शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्य विकास क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर पुरस्कारचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे.