

नऊ वर्षाच्या चिमुकलीस पैशाचे अमिष देऊन शौचालयात डांबले
जळगाव (Jalgaon), 6 ऑगस्ट वरणगाव शहरातील एका भागातील नऊ वर्षाच्या चिमुकलीस पैशाचे अमिष देऊन घराच्या शौचालयात डांबून ठेवल्याने एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराशेजारी राहणाऱ्या नऊ वर्षाची चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्याच शेजारी राहणारा नंदकिशोर मधुकर चौधरी (वय ४६) याने दहा रुपयाचे आमिष देऊन तिला घरात बोलावून हात धरून घराच्या शौचालयात कोंडले होते.
बराच वेळ झाला तरी मुलगी घरात आली नाही म्हणून मुलीला शोधत असलेल्या नातेवाईकांना त्याच परिसरातील एकाने तुमची मुलगी या घरात आहे असे सांगितल्याने नातेवाईक नंदकिशोर चौधरी यांच्या घरी आमची मुलगी आहे का? असे विचारले असता त्याने इथे नाही असे सांगितले.
मात्र घराच्या शौचालयाच्या दिशेने लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तिकडे धाव घेत तीची शौचालयातून सुटका केली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार नंदकिशोर चौधरी याच्या विरोधात भारतीय न्यायसहीता १२६ (२) , १२७ (२) , ७४ , ७५ , ८ , १२ , पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली पुढील तपास पो. उ. निरिक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे