दि. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन खर्चे

0

दि. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवीन अध्यक्षपदी डॉ. नितीन खर्चे

यवतमाळ: महाराष्ट्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दि. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अभाविप चे पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.

डॉ. खर्चे हे एक अत्यंत कुशल आणि अनुभवी व्यक्तीत्व असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांमध्ये जबाबदाऱ्या स्वीकारून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.

डॉ. खर्चे यांच्या अध्यक्षपदाखाली बँकेची अधिक उन्नती होईल आणि ती नवीन शिखरे गाठेल यात शंका नाही.

डॉ. नितीन खर्चे यांना या नवीन जबाबदाऱ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा!