सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्याथ्र्यांच्या कलागुणांचे दर्शन – सरस्वती शिशुमंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न श्रद्धेय

0
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्याथ्र्यांच्या कलागुणांचे दर्शन - सरस्वती शिशुमंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न श्रद्धेय
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्याथ्र्यांच्या कलागुणांचे दर्शन - सरस्वती शिशुमंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न श्रद्धेय
बाळासाहेब देवरस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केशव माधव शिक्षण संस्थेद्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या त्रिदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पालकांच्या उपस्थितीत सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आणि रंगमंचाचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी केशव माधव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर दिवे, कार्यकारी अध्यक्ष मनोहर पेटकर, संस्थेचे सचिव प्रशांत बोपर्डीकर होते तर मंचावर प्रायमरीच्या मुख्याध्यापिका मृदुल भुते, हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल गाडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना प्रशांत बोपर्डीकर यांनी संवाद साधला. यानंतर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते चौथा वर्ग या गटातील विद्यार्थ्यांनी देवा श्री गणेशा, झुंबा डान्स, लावणी, कोळीगीते, हिंदी- मराठी लोकप्रिय गीतांवरील सामूहिक नृत्य, त्याचप्रमाणे वर्ग ५ ते १० या गटातील विद्याथ्र्यांनी प्रारंभी महिषासूरमर्दिनी स्तोत्रावर नृत्य, सारे जहां से अच्छा हे देशभक्तीपर गीत त्याचप्रमाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे नृत्य सादर केले. दहावीच्या विद्याथ्र्यांनी सत्यम शिवम सुंदरम, ए मेरे वतन के लोगो आदी लोकप्रिय गीते सुरेख नृत्यांच्या माध्यमातून खुलविली आणि उपस्थित पालकांच्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना, लता मंगेशकर यांच्या गीतांच्या दृकश्राव्य क्लिप्स दाखविण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर कालुसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार यांनी भेट दिली व विद्याथ्र्यांचे कौतुक तर आयोजनाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकवृदांची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे संचालन मानसी तितरमारे व पूजा वैद्य यांनी केले. शेवटी मुख्याध्यापिका मृदुल भुते यांनी आभार मानले.