


5 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव मंडळांची नोंदणी
(Nagpur)नागपूर – कला, साहित्य, संस्कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या ‘सांस्कृतिक गणेशोत्सव’ उपक्रमाला गणेशोत्सव मंडळे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणा-या संस्थांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे.
19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सव सुरू होत असून त्याला सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप देण्यासाठी संस्कार भारतीच्या संयोजनात नाट्य संगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तिगीत, अभंग, देशभक्तीपर गीत, गीतरामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारूड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपरिक खेळ, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन (हिंदी व मराठी), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम, बँड व ढोलताशा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याकरीता इच्छूक गणेश मंडळांनी शेवटच्या क्षणी गोंधळ होऊ नये याकरीता 5 सप्टेंबर 2023 पूर्वीच श्री. नितीन गडकरी यांचे संपर्क कार्यालय, सावरकर नगर, ऑरेंज सिटी हॉस्पिटल समोर, खामला चौक, नागपूर येथे किंवा अधिक माहितीकरीता राम ठाकरे (8446218357), पुष्कर जोध (8390979307) व कार्यालय (0712-2239926, 0712-2239920) यांच्याशी दुपारी 12 ते 4 या वेळात संपर्क साधून नोंदणी करावी.
नोंदणी शुल्क रु. 50 असून एका गणेशोत्सव मंडळाला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीकडून एकच कार्यक्रम देण्यात येईल, असे खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, (President of Nagpur Prof. Anil Sole)नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी कळवले आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे उपाध्यक्ष (Madhup Pandey)मधूप पांडे, (Gaurishankar Parashar)गौरीशंकर पाराशर, (Ashok Mankar) अशोक मानकर, (Dilip Jadhav)दिलीप जाधव, (Secretary Jaiprakash Gupta)सचिव जयप्रकाश गुप्ता, (Treasurer Prof. Rajesh Bagdi)कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य (Balasaheb Kulkarni,)बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.