

नागपूर (NAGPUR) : सीएस सारा काटावाला यांची नागपूर आयसीएसआय चॅप्टरच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. तर सीएस मोहित बत्रा उपाध्यक्ष, सीएस हर्षल किल्लेदार सचिव आणि सीएस दीशा श्रॉफ खजिनदार म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांचा कार्यकाळ १९ जानेवारी २०२५ पासून १८ जानेवारी २०२६ पर्यंत असेल.
अन्य सदस्यांमध्ये सीएस भावेश थडानी (माजी अध्यक्ष), सीएस खुशाल बजाज (सदस्य), सीएस सुमित खीचा (सदस्य), आणि सीएस दीप्ती जोशी (क्षेत्रीय परिषदेच्या सदस्य व नागपूर चॅप्टरच्या माजी पदसिद्ध सदस्य) यांचा समावेश आहे.
नागपूर चॅप्टर ऑफ डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएसआय ही विदर्भ प्रदेशातील विद्यार्थी आणि सदस्यांना सेवा पुरवणारा एकमेव चॅप्टर आहे. सध्या, या चॅप्टरच्या कार्यक्षेत्रात ५०० हून अधिक सदस्य आणि सुमारे ४००० विद्यार्थी आहेत. नवीन कार्यकारिणीचा उद्देश कंपनी सेक्रेटरी व्यवसायाचे व्यावसायिक ब्रँड ओळख वाढवणे, विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवणे, आणि या क्षेत्राचा विकास साधणे आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ही भारतातील कंपनी सेक्रेटरी व्यवसायाचे नियमन करणारी आणि त्याचा विकास करणारी एकमेव मान्यताप्राप्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९८० च्या कंपनी सेक्रेटरी अधिनियम अंतर्गत करण्यात आली आहे आणि ती भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. सध्या ICSI कडे ७०,००० हून अधिक सदस्य आणि २.५ लाख विद्यार्थी आहेत.
ICSI चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्याच्या चार प्रादेशिक कार्यालयांमध्ये नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई यांचा समावेश आहे. तसेच, भारतभर ७३ चॅप्टर्स आहेत. ICSI भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी शासनाच्या उपक्रमांमध्ये आपले योगदान देत आहे.