

गणेश जयंती निमित्त मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी : बारामती तालुक्यातील अष्टविनायकाचे अग्रस्थान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदीरात गणेश जयंतीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून गणेश भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे.
मयुरेश्वराच्या मंदिरात प्रमुख उत्सवापैंकी मुक्तद्वार यात्रा प्रमुख उत्सव असतो. या यात्रेदरम्यान गणेश भक्तांना थेट मंदिराच्या गाभार्यात जाऊन गणेश मूर्तीला जलाभिषेक करण्याची संधी असते. माघ आणि भाद्रपद या महिन्यांमध्ये वर्षातून दोनदा अशी पर्वणी भाविकांना मिळते. सध्या मंदिरात सध्या माघी उत्सव सुरू आहे. आज गणेश जयंतीचे औचित्य साधून राज्यभरातल्या गणेशभक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे.