
(Mumbai)मुंबई– राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला राष्ट्रद्रोहाचा आरोप असणाऱ्या झाकीर नाईककडून साडेचार ते पाच कोटी रुपयांची (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) मदत देण्यात आली असून या प्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. टेरेरिंग फंडिंगचा आरोप असलेल्या झाकीर नाईक याच्याकडे साडेचार कोटी रुपये कसे आले? असा सवाल उपस्थित करीत फडणवीस यांच्याकडे माहिती नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी राऊत यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले.(Minister Dada Bhuse) मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली 178 कोटी रुपये गोळा केले. हे पैसे आहेत कुठे? याप्रकरणी भुसे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असून सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीसांचे अत्यंत जवळचे (Rahul Kul)राहुल कुल यांच्या भीमा-पाटस कारखान्यात 500 कोटींचे मनी लॉण्डरिंग झाले आहे. यासंदर्भातही ईडीकडे तक्रार केली असल्याचा दावा राऊत यांनी केला.