

अमरावती (Amravati) – हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावतीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बॅटिंग केली आहे. त्यामुळे शेतातील गहू, ज्वारी, संत्रा, लिंबू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले होते. मात्र, काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. कारागृहातील कैद्यांना खुल्या बाजारातील कांदा खाण्याची वेळ येणार आहे. कारागृहात सध्या, वांगी, टोमॅटो, कांदा, पाकलभाजी, घोळभाजी, लिंबू, दोडके यांसह अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रतिभा विरूळकर, कृषी अधिकारी, अमरावती मध्यवर्ती कारागृह
यांनी दिली.