चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे १३३३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

0

चंद्रपूर CHNDRAPUR  2 डिसेंबर :  जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतमालाचे – फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कालावधीत अथवा यापुढे होणा-या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे – फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे विहित कार्यपध्दतीनुसार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून १३ हजार ३३५ हेक्टरवरील Damage to crops पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

शहरासह जिल्ह्यातील काही भागात ३ दिवस अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला बसला असल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात १३ हजार ३३५ हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे तातडीने केले जात आहे. चंद्रपूर ४७, बल्लारपूर २, मुल १५, पोंभुर्णा तालुक्यातील ३५ अश्या जिल्ह्यातील एकूण ९९ गावे नुकसानीची असून त्याचा फटका ३२ हजार ८७५ शेतकऱ्यांना बसला आहे.