

(Nagpur)नागपूर : नागरिकांना पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविऱ्यांपापासून स्वतः नागरिकांनीही सावध असले पाहिजे असे आवाहन करताना बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना फसविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’ अशी माहिती (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
फडणवीस यांनी सांगितले की, अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी कारवाई करण्यात येईल. गुन्हा घडल्यानंतरही अनेक जण शांत राहतात. कारवाई होत असताना लोक पुढे येतात. बोगस योजनांना बळी पडू नका, असे फडणवीस म्हणाले.वसुली करण्यासाठी कायद्यात बदल करावा, अशी मागणी आमदार अशोक चव्हाण यांनी केली. त्यावर, ‘जप्त केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासंदर्भात कायद्यात बदल करण्यासाठी अभ्यासगट तयार करू. तीन महिन्यांत सुधारणा करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्याची मागणी (MLA Balasaheb Thorat)आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. ईओडब्ल्यूकडे असे प्रकरण येतात. ईओडब्ल्यूची व्याप्ती वाढविली आहे. तेथे विशेष अधिकारी नेमण्याचा विचार करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.