माजी क्रिकेटपटू श्रीसंत पुन्हा एकदा वादात

0

तिरवनंतपूरम Thiruvananthapuram -फिक्सींगवरुन काही वर्षांपूर्वी वादात सापडलेला माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध केरळमध्येही गुन्हाही दाखल केला आहे. त्यात श्रीसंतसह त्याच्या दोन जवळच्या मित्रांवर १८ लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. उत्तर केरळमधील एका व्यक्तीने यासंदर्भात तक्रार दिली होती. (Cricketer Sreesanth booked for cheating)


तक्रारदार सरिश गोपालन यांच्या तक्रारीनुसार श्रीसंत, राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी 25 एप्रिल 2019 पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अनेकवेळा ही रक्कम घेतली होती. त्यांना अकादमीत भागीदार होण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी पैसे गुंतविले होते. श्रीसंत आणि इतर दोन आरोपींविरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००८ मध्ये श्रीसंत हा हरभजनसिंगसोबतच्या वादात अडकला होता. तर २०१३ मध्ये आयपीेल दरम्यान तो स्पॉट फिक्सींगमध्ये दोषी आढळला होता. त्यावेळी तो राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करीत होता.