
अहमदाबाद Ahmedabad – क्रिकेट वर्ल्ड कप Cricket World Cup स्पर्धेचा आज होणारा उद्घाटनाचा सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. हा सोहळा रद्द करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्घाटन सोहळ्याऐवजी केवळ १० संघांच्या कर्णधारांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे Cricket World Cup opening ceremony cancelled
यापूर्वीच्या माहितीनुसार, बुधवारी उद्घाटन सोहळ्याचे नियोजन होते. त्यात पार्श्वगायिका आशा भोसले, अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री तमन्ना भाटिया, गायिका श्रेया घोषाल, गायक शंकर महादेवन आणि अरिजित सिंह हे दिग्गज सहभागी होणार होते. मात्र, आता आज फक्त १० संघांच्या कर्णधारांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळ्याऐवजी लेसर शो होणार असल्याची माहिती आहे.