नंदीबैल बनवण्याच्या कामात कारागीर व्यस्त

0

 

(Wardha)वर्धा- पोळा जवळ आल्याने बाजारात तसेच कारागिरांची धावपळ वाढली आहे. वर्धा जिल्ह्यातील छोटी आर्वी या गावातील युवक प्रथमेश दारुणकर याला लहानपणापासून नंदीबैल बनवण्याची आवड आहे.

लाकडी खोडापासून छान नंदी बैलाचे हुबेहूब स्वरूप तो देतो. कलेच्या माध्यमातून नंदीबैल बनवण्याचे काम गावात अनेक वर्षापासून वडिलोपार्जित व्यवसायात तो करीत आहे. लहान पोळ्याकरिता नंदीबैल करण्याच्या कामांमध्ये प्रथमेश दारुणकर हा व्यस्त आहे. त्याच्याकडे दोन हजारापासून ते दहा हजारापर्यंत नंदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याने तयार केलेले नंदीबैल खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करताना दिसतात.