

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी केली कारवाई
प्रेयसीला धावत्या कारच्या स्टिअरिंगवर बसवून कार चालवणारा प्रियकर अश्लील चाळे करत असल्याची एक चित्रफीत झपाट्याने समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. ही चित्रफीत पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचताच आयुक्तांनी प्रेयसी आणि प्रियकराचा शोध घेण्याचे आदेश दिले. सीएसह तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात आता सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक आणि त्याच्या प्रेयसीची ओळख पटवित त्यांना पालकासह चौकशीसाठी पोलीस ठाण्यातही बोलावले आहे. व्हिडिओ मधील संशयित आरोपी सूरज राजकुमार सोनी (वय 28, रा. मानकापूर) हा सनदी लेखापाल आहे. तर त्याची प्रेयसी अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे शंकर नगर ते लक्ष्मी नगर चौकातून चारचाकीने जात असताना प्रेयसीने अश्लील चाळे सुरु केले. नागपूरच्या लॉ कॉलेज ते धरमपेठ परिसरादरम्यान धावत्या कारमध्ये हा प्रकार घडला आहे.
दरम्यान हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य लोक पाहत असून ते व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, यांचे पण भान या प्रेमी युगलांना नव्हते. त्यामुळे नागपूरच्या रस्त्यावर खुल्लम खुल्ला प्यार सुरू असल्याचा प्रकार नव्याने समोर आला आहे. प्रेमीयुगुलाच्या अश्लील चाळ्यांची चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर या घटनेची दखल घेत पोलिसही सक्रिय झाले. पोलिसांनी कारच्या क्रमांकाच्या आधारे चालक आणि तरुणीचा शोध घेतला. कारचालक आणि त्याच्या प्रेयसीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पालकांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. चौकशीनंतर पोलिसांनी सूरज सोनी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांत मोटारवाहन कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका देखील केली.
Social Media वर व्हिडिओ व्हायरल
सूरज सोनी हा सोमवाच्या सायंकाळी कारने लॉ कॉलेज चौकात आला. काही वेळात त्याची प्रेयसीही तेथे आली. त्यानंतर तिने आपली मोपेड जवळच पार्क केली आणि ती कारमध्ये बसली. त्यानंतर दोघेही कारने धरमपेठकडे निघाले. गिरीपेठ परिसरात तरुणी कारचालक सूरजच्या समोर बसली. त्यानंतर दोघेही धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करायला लागले. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार काही उपस्थितांनी हे चाळे मोबाइलमध्ये कैद केले. त्यानंतर ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले.