बुलढाण्यात कोरोना जेएन1 रुग्ण

0

 

बुलढाणा – कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने राज्यातील अनेक जिल्ह्यातील भागात एंट्री केली आहे. काल बुलढाणा जिल्ह्यात देखील कोरोनाने एंट्री केली आहे. यात बुलढाणा शहरातील 48 वर्षीय आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारीचं पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. राज्यातील अनेक भागात रोज नवीन रुग्ण असल्याचे समोर येत आहे. बुलढाण्यात देखील काल आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने या 48 वर्षीय कर्मचाऱ्याने कोरोना टेस्ट केली. त्यात सदर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोना संसर्गित रुग्ण बुलढाणा शहरातील चिखली मार्गावर हाजी मलंग दर्ग्याच्या मागे एका नगरात राहतो. त्याला होम आयसोलेटेड करण्यात आले आहे. आता जेएन1 व्हेरियंटच्या तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहेत तर नागरिकांनी घाबरून न जाता नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.