मध्यप्रदेशात मुस्लिमांचा हिंदू धर्मात प्रवेश

0

इंदोरच्या खजराना गणेश मंदिरात झाले धार्मिक विधी

इंदोर(Indore), 28 जून :- मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये 20 मुस्लिमांनी एकाच वेळी धर्मपरिवर्तन करून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. इंदोरच्या सुप्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात हे सामूहिक धर्मांतर झाले. याठिकाणी धर्मांतरासाठी विशेष विधी आयोजित करण्यात आला होता.

इंदोरच्या खजराना मंदिरात आज, शुक्रवारी मुस्लिम समाजातील 20 लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्मांतर करणाऱ्यांमध्ये एक इंदोरच्या खजराना भागातील नागरिक असून उर्वरित इतर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धर्मांतर करणाऱ्यांमध्ये 12 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. हिंदू धर्माची संपूर्ण माहिती गोळा करून अभ्यास केल्यानंतरच त्यांनी धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात. या लोकांना खजराना गणेश मंदिरात मंत्रोच्चार करून हिंदू धर्मात परत घेतले. खजराना मंदिरात येण्यापूर्वी या सर्वांना पाटीदार समाजाच्या धर्मशाळेतील पंडितांनी गोमूत्र, माती आणि 10 नद्यांच्या पाण्याने स्नान केले. यानंतर त्यांना भगवे कपडे घालून खजराना मंदिरात आणण्यात आले. येथील धार्मिक विधीदरम्यान त्यांचा धर्म बदलण्यात आला.गेल्या 27 एप्रिल रोजी या मंदिरात 8 मुस्लिमांनी सनातन धर्म स्वीकारला होता. खजराना येथील रहिवासी असलेल्या हैदरने आपले नाव बदलले होते, त्यानंतर त्याने आपले नाव हरि असे ठेवले.

दरम्यान आज, शुक्रवारी धर्मांतर करणाऱ्या मुस्लिमांची नावे बदलून हिंदू नावे ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार आता निलोफर शेख (निकिता), अक्षन शेख (आकांशा), रझाक सय्यद (रोहित), अंजुम शहा (आरती) अबरार (अभिषेक), मुबारिक (मनीष), जमिला (जमुनाबाई), रहमान (हिरालाल), रईस (राजू), रईस खान (अर्पित), सुरय्या (पूजा), मेहरून (ममता), कालू-खा (करुलाल), रूकय्या (रूक्मिणी), जरीना (जान्हवी), जाकिर (राहुल) रजिया (राणी) शमिम शाह (शानू) असे नाम परिवर्तन करण्यात आलेय.