

महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली आता चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे मात्र तत्पूर्वीच गावागावांमध्ये कोण जिंकणार कोण हरणार याची चर्चा आता रंगू लागली आहे त्यातच चर्चा इतकी वेगवेगळ्या विकोपाला जाऊ लागली आहे की एकमेकांच्या अंगावर देखील लोक जाऊ लागले आहेत. अशाच एका वादातून मारहाण होऊन एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. (Nagpur)
नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात रामटेक लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरुन गेला आहे.
गावातील पारावर बसलेल्या तरुणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले.
Controversy over election results; One was killed in the district
या मारहाणीत जबर मार लागल्याने सतीश फुले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण बोरडे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालावरुन झालेल्या या हत्येने परिसर हादरुन गेला आहे.