

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात राहुल पावडे यांचे मनपा व पिडब्लूडी प्रशासनाला शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर
चंद्रपूर (Chandrtapur) :- चंद्रपूरात गेल्या काही दिवसापासून पावसामुळे रस्त्यावर खड्डे झाले आहे. शहरात गणरायाचे आगमन झाले असून चंद्रपूर शहरात मोठ्या संख्येने भावीक भक्त विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता तसेच गणेश देखावे बघण्यासाठी जिल्हा बाहेरून व गाव खेड्यातून चंद्रपूर शहरात येतात. त्यामुळे अनंत चतुर्थीच्या अगोदर शहरातील पावसामुळे निर्माण झालेले खड्ड्ये लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी आमदार तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यांना केली आहे.
या संदर्भात आमदार तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या खड्ड्याबद्दल प्रशासनाला दूरध्वनीवरून सूचना करण्यात आल्या. शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे काही रस्त्यावर खड्डे निर्माण झाले. ते तातडीने लवकरात लवकर बुजवण्यात यावे आणि गणेश भक्तांनादिलासा द्यावा, अशीही विनंती मनपा आयुक्त विपिन पालीवाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्याकडे भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी चर्चेदरम्यान केली.
गणेश भक्तांची मिरवणुकी दरम्यान तसेच गणेश देखावे बघण्याकरिता कोणताही त्रास होऊ नये याकरिता रस्त्यावर पडलेले खड्डे हे लवकरात लवकर बुजवण्यात यावे व गणेश विसर्जन प्रेमींना कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक प्रवास होणार नाही याची दक्षता घ्यावी, याकरिता मनपा आयुक्त आणि पिडब्लूडी विभागाकडे भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.
निवेदन देतांना यावेळी सविताताई कांबळे मोहन चौधरी,सचिन कोतपल्लीवार सुनील डोंगरे शीला चव्हाण बी.बी सिंग महेश जिटे, प्रलय सरकार, धम्मप्रकाश भसमे,रवी चहारे, मुन्ना एंलटम, आदींची उपस्थिती होती