काँग्रेस २९० जागा लढविणार? चाचपणी सुरु

0

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आढावा घेणारी काँग्रेसची दोन दिवसांची बैठक पार पडली असून देशातील २९० जागांवर उमेदवार उभे करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. पक्षामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसच्या आघाडीच्या समितीची बैठक पार पडली. यात काँग्रेस २९० जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असा निश्चय करण्यात आलाय. विशेष या जागांवर कोणत्या उमेदवारांना तिकीट देण्यात यावे याची चाचपणीदेखील पक्षाकडून करण्यात येत आहे. देशभरातील ज्या जागांवर काँग्रेसची पकड मजबूत आहे. त्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. काँग्रेसने मागील निवडणुकीत ५२ जागा जिंकल्या होत्या तर २०९ जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय काही मतदारसंघात काँग्रेसची परिस्थिती सुधारल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे एकूण २९० जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न पक्षाचा प्रयत्न आहे. इतर जागांवर मित्रपक्षांना संधी देण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्रात निम्म्या जागांचा विचार काँग्रेसकडून सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.