काँग्रेस लागली भव्य सभेच्या तयारीला

0

नागपूर- कॉंग्रेस Congress पक्षाचा १३८वा स्थापना दिवस आम्ही साजरा करतोय.कॉंग्रेस हायकमांडने आम्हाला ही संधी दिली.नागपूरमध्ये मोठी रॅली करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यादृष्टीने जोरात तयारी सुरु आहे
जे जे सरकार देशावर आणि भारतमातेवर अन्याय करते त्या सरकारच्या विरोधातला एल्गार या नागपूरच्या भूमीवरुन आजवर झालाय यामुळेच नागपुरात होणाऱ्या सभेला आगळंवेगळं महत्व पाहायला मिळणार आहे
2024 निवडणूक दृष्टीने पक्ष प्रभारी बदल संदर्भात बोलताना केरळमध्ये प्रदेशाध्यक्ष, पक्ष नेता म्हणून काम केलेले संघटनेचा अनुभव असलेले नेतृत्व रमेश चेन्नीथला यांना प्रभारी म्हणून दिलं. महाराष्ट्राला नक्कीच यामुळे बळकटी प्राप्त होईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेश संबंधात खा प्रताप चिखलीकर यांचे वक्तव्य यावर बोलताना जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तीशाली होते… तेव्हा अफवा पसरवतात असे सांगत इन्कार केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच, बेंबीच्या देठापासून लोक ओरडत होते. त्यात नवीन काही नाही. सव्वा वर्षा झालं ते जाणार होते त्यांच्याबद्दल अफवा पसरवण्याचे काम भाजप करत आहे. स्वतःच्या मनाला शांत करण्याचे काम ते करत आहे. त्याकडे फार काही लक्ष देऊ नका
शरद पवार -अदानी भेट संदर्भात त्यांचा तो पक्ष आहे. ते कुणाला भेटतात. कोणाच्या पक्षात काय करायचं आहे त्याची हे आम्हाला काही करायचे नाही. विरोधी पक्षाचे जे लोक सोबत आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जात आहोत. आरक्षणाचा विषय ,सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याच काम करत आहे. ही भाजपची नीती आहे.प्रत्येक राज्यात भांडण पेटून विभाजनाचा फायदा घेण्याचे काम भाजप करत आहे. जरांगे पाटलांना सरकारने जे आश्वासन दिले ते नियमात बसत होते का? भाजप आणि संघाची स्क्रिप्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचत आहेत. हे राज्याच्या जनतेला कळलंय. त्यामुळे सरकारने जरांगे पाटलांना कसं सांभाळायचं हे ठरवावे, अधिवेशनात सरकार विदर्भाच्या प्रश्नावर बोलले नाही, चर्चा केली नाही सत्तेत असताना विदर्भाला काहीच दिलं नाही त्याचे परिणामजनतेला भोगावे लागतात.
क्युरेटिव्ह पिटीशन बाबतीत मी विधानसभेत सुद्धा रेकॉर्डवर मांडलेलं आहे की तत्कालीन ऍडव्होकेट जनरल कुंभकोणी यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, मराठ्यांची बाजू न्यायालयात मांडू नका, सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की, मागासलेपण सिद्ध करण्यासाठी गायकवाड आयोग नेमला होता, त्याला तो अधिकार नाही.मराठा आरक्षणा विरोधात जे दोन वकील न्यायालयात गेले ते कोणाचे माणसं आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पेटीशन मान्य केली. त्यामुळे आमचं लक्ष आहे. शांततेने आरक्षणाचे प्रश्न सुटावेत. या सगळ्यावर जातीनिहाय जनगणना हाच महत्वाचा पर्याय आहे
राहुल गांधी यांनी हे वारंवार मांडले आहे. बहुजनांचा आर्थिक सामाजिक विकास होऊ नये, अशा पद्धतीची भाजपची मानसिकता स्पष्ट होत असल्याचे पटोले म्हणाले.