तेलंगणा : काँग्रेसला 65 जागांवर आघाडी

0

 

हैदराबाद, 03 डिसेंबर  : तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांची आज, रविवारी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीत सुरुवातीलाच काँग्रेसने 65 जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) 41 जागांवर, भाजप 8 आणि एआयएमआयएम 5 जागांवर आघाडीवर आहे. Telangana

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. रेड्डी जवळपास 1700 मतांनी आघाडीवर आहेत. हैदराबादच्या जुबली हिल्समधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आघाडीवर आहेत. गोसमहलमधून टी राजा सिंह पिछाडीवर आहेत. तर एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी हे चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.