नागपूर (Nagpur) -काँग्रेसचे नेते,माजी मंत्री सुनील केदार यांचे निष्ठावंत माजी जिप उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपात प्रवेश घेतला.आज केदार समर्थक काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे नामांकन दाखल होणार असताना केदार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
काल गडचिरोलीचे माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात प्रवेश घेतला. आज मनोहर कुंभारे यांना भाजपने आपल्याकडे घेतल्याने सावनेर विधानसभा मतदारसंघात नवे समीकरण पहायला मिळू शकते. यावेळी माजी आमदार डी मलिकार्जुन रेड्डी, माजी जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















