

छत्तीसगड: (Chhattisgarh Congress Leader Suicide)छत्तीसगडमधील चांपा जिल्ह्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसमवेत विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचराम यादव (६५), त्यांच्या पत्नी नांदणी यादव (५५), आणि दोन मुलांपैकी सूरज यादव (२७) आणि निरज यादव (३२) यांनी विष घेतले. सर्व चार जणांना प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बिलासपूरमधील सिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी या चौघांचा मृत्यू झाला.(Congress leader along with his family poisoned, four die)
पंचराम यादव, काँट्रॅक्टर होते, त्यांनी दोन बँकांकडून ४० लाखांचे लोन घेतले होते आणि त्यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता. त्यांची पत्नी कर्करोगाशी झुंज देत होती, तर एक मुलगा खासगी कंपनीत काम करत होता आणि दुसरा काँट्रॅक्टर्सच्या कामात होता.
मिळालेलेया माहितीनुसार, त्यांनी घराच्या दोन्ही गेटांना कुलुप लावले आणि तिसऱ्या गेटवरून आतून कुलुप लावून आत्महत्या केली. घराच्या बाहेरून आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नसल्यामुळे, त्यांच्या घरी आलेल्या एका मुलीला संशय आला, तिने स्थानिकांना माहिती दिली. त्यानंतरच या प्रकाराचा उलगडा झाला.
पोलिसांनी घर सील केले असून चौकशी सुरू केली आहे. आत्महत्येच्या कारणांवर अजून तपास सुरू आहे, पण आर्थिक तणाव आणि कुटुंबातील आजार याला कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.