काँग्रेस विकास ठाकरे यांचा राजकीय बळी घेत आहे – धर्मपाल मेश्राम

0

 

नागपूर (Nagpur)- नागपूर लोकसभा निवडणुकीत एकीकडे भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमीदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेसमधून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना नागपूरातुन उमेदवारी म्हणजे त्यांचा राजकीय बळीच प्रकार असल्याचे टीकास्त्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सोडले आहे. काँग्रेस ठाकरे यांचा राजकीय बळी घेत आहे.

गडकरी यांनी नागपूरात मेट्रो,मिहान असे सर्वांगीण एवढे काम केले आहे ज्यामुळे एकतर त्यांच्या विरोधात लढायला कुणी तयार नाहीत,आता विकास ठाकरे उभे झाले तरी नक्की त्यांचा पराभव होणार आहे. सहाही मतदारसंघात भाजपला मोठी लीड मिळेल आणि त्याचा प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पण पडणार असल्याचा दावा त्यांनी केला.