काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे-गडकरी

0

 

नागपूर (Nagpur) -80 वेळा घटना तोडणारे काँग्रेसवाले आज भाजपबद्दल अपप्रचार करीत आहेत.संविधान बदलताच येत नाही हे वास्तव आहे. सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे. संविधानातील मूलभूत रचनेला धक्का लावता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र जे कामाच्या भरवशावर निवडून येऊ शकत नाहीत, ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अपप्रचार करीत आहेत, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

दक्षिण नागपुरातील म्हाळगी नगर चौक येथे गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते सूरज गोजे आदींची उपस्थिती होती. ‘नागपूर शहरात अजून बरीच कामे करायची आहेत.

रिंगरोडवर लवकरच उड्डाणपुलाची निर्मिती होणार आहे. याच मार्गाने इलेक्ट्रिक ट्रॉली बस सुरू करण्याचाही माझा प्रयत्न आहे,’ असेही गडकरी म्हणाले. कुठलेही मदतीचे, विकासाचे काम करताना जात-पात-धर्म बघितला नाही. मी जातीचे राजकारण कधीच केले नाही. ताजबागच्या सौंदर्यीकरणाचे काम केले आणि दीक्षाभूमीचे काम सुरू झाले आहे,याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.