

पुणे (Pune) :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे वतीने फुले वाडा पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त त्यांच्या अर्धंकृतीपुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांचे हस्ते माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
११ एप्रिल २०२५ ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा गंज पेठ , पुणे येथे .सकाळी ११ वा .महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीआई फुले यांच्या अर्धकृतीपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने श्री.किशोर कन्हेरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी मंत्री श्री.बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार सौ.दिप्ती चौधरी, वरीष्ठ काॅ.नेते मोहन जोशी , पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री.अरविंद शिंदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमरारे, राहुल झगडे, सत्यशोधक समाजाचे नेते शंकरराव लिंगे (सोलापूर), प्रदीप वैद्य (नाशिक), अजय तायडे,सचिव ओबीसी सेल (पुणे),धन्नालाल नागरिकर , विजय बाहेकर (गोंदिया), नंदु नागरकर, (चंद्रपूर) , शंकरराव क्षिरसागर (अकोला), प्रशांत भोसले (विश्वकांति मराठा संघ पुणे ), अनुराग क्षिरसागर, प्रशांत सुंरसे, रवी पाटील व पूणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी महाराष्ट्र व विदर्भातुन मोठ्या संख्येने आलेले ओबीसी समाज बांधव व फुले अनुयायी उपस्थित होते.
यावेळी श्री.किशोर कन्हेरे यांनी फुले वाडा येथील सविस्तर माहिती प्रदेश अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ यांना दिली व फुले वाडा परिसरातील महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना समाजव्यवस्थेतील समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा समावेश आपल्या महान संविधानात झाला आहे. या मूल्यांची पायाभरणी आणि ज्योत तेवत ठेवण्याचं महान कार्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या प्रेरणादायी दांपत्याने केलं आहे. त्यांचे विचार आणि संघर्ष आजही संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना दिशा देतात असे आपल्या संदेशात सांगितले.