

-पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)
-भाजप ,महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ विराट सभा,चंद्रपूरच्या जाहीर सभेत विरोधकांवर निशाणा,शिवसेनेवर टीकास्त्र, मोदींच्या गॅरंटीने दिला विश्वास नागपूर – काँग्रेसने अनेक समस्या वाढविल्या, जनमानसातला विश्वास गमावला. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने अयोध्येत राम मंदिर तसेच काश्मीरच्या दृष्टीने कलम 370 अशा विविध स्थायी उपायांवर भर दिला असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथील विराट जाहीर सभेत केले. कारले तुपात आणि साखरेत कितीही घोळले तरी ते कडू ते कडूच अशी मराठी म्हण सांगत काँग्रेसवर निशाणा साधला. भाजप- सेना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यासह अनेक आमदार, माजी आमदार व इतर मान्यवर मान्यवर उपस्थित होते. रखरखत्या उन्हात लाखोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
उद्यापासून घरोघरी जाऊन माझा नमस्कार जनतेला सांगा,माझे मित्र सुधीरजी मुनगंटीवार आणि अशोकजी नेते यांना निवडून द्या, मोदीजींचे हात बळकट करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील पहिल्या सभेत चंद्रपूर येथे केले. पंतप्रधान म्हणाले,कधीकाळी बाळासाहेब ठाकरे काँग्रेस विरोधात होते.आज नकली शिवसेना काँग्रेससोबत आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले ते काँग्रेसनेच निर्माण केले .धर्म, जातीच्या नावावर विभाजन केले, काश्मीरचा प्रश्न उभा केला. एकीकडे दुसरे देश प्रगती करत असताना आपला देश मागे राहिला. अनेक दशके या देशात बॉम्बस्फोट,तूष्टीकरणाचे राजकारण आणि लाल आतंक अर्थात नक्षलवादाने विक्राळ रूप धारण केले होते. राम मंदिराच्या निर्मितीत अडसर निर्माण कोणी केला, कोर्टात कोण गेले राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोण आले नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी मिळू दिले नाही अशा अनेक प्रश्नांची काँग्रेसवर सरबत्ती करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी थेट जनतेशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला जो लोकांना भावला. सकाळी उठून रोज घरोघरी जा,माझा नमस्कार सांगा, अधिकाधिक मतदान करायला लोकांना लावा अशी कळकळीची विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली. मोदी गॅरंटीमुळे दलित आदिवासी मागासवर्गीयांचे जीवन बदलले, वंचित वर्गाला उज्वला गॅस, शौचालय, मोफत रेशन, पंतप्रधान आवास अशा विविध योजनांचा लाभ मिळाला. सर्वसामान्यांचा, देशाचा स्वाभिमान वाढला हे श्रेय केवळ मोदींचे नव्हे तर तुमचे देखील आहे असे सांगितले. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला आपण पूर्ण बहुमत दिले.अनेक प्रलंबित प्रश्नांवर स्थायी उपाय आम्ही केले.
कधीकाळी गडचिरोली नक्षलवादग्रस्त म्हणून ओळखला जात होता आता ते शहर पोलाद सिटी होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूरच्या भूमीतून अयोध्येतील राम मंदिर तसेच नव्या संसद भवनासाठी लाकूड आले, चंद्रपूरची ख्याती देशातच नव्हे तर जगात पोहोचली यावर भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम माता महाकालीच्या पावनभूमीत शक्तीला नमन करतो अशी मराठीतून सुरुवात करीत जनतेशी संवाद साधला.