
अमरावती – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे. मोदीजी है, तो मुमकीन हैं.
लोकं मोदींवर विश्वास ठेवतात. तीनही राज्यात मोदींच, भाजपचे सरकार मोठ्या बहुमताने आलं. आणि कॉंग्रेसचा अहंकाराचा फुगा फुटला अशी प्रतिक्रिया खा अनिल बोडे यांनी दिली.
-शेतकरी असो, युवक असो, महिला असो, विद्यार्थी असो, व्यापारी असो सर्वांना वाटतं की, आपलं राज्य पुढे गेल पाहिजे. आपला देश पुढे गेला पाहिजे. देश पुढे नेण्याची गॅरंटी मोदी आहेत. कॉंग्रेस जेव्हा जेव्हा मोदींना वाईट बोलली, तेव्हा तेव्हा कॉंग्रेस ला लोकांनी झिडकारलं.हा विजय अतिशय महत्वाचा आहे.भारताच्या भविष्याचा हा विजय आहे.