Congress : आमदार बनण्यासाठी 20 हजार रुपयांचा फॉर्म

0
shankhnnad news

सोलापुरात काँग्रेसकडून अर्ज विक्री

सोलापूर(Solapur) :- राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगले यश मिळवले. यामुळे काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. विधानसभा निवणुकीच्या अनुषंगाने आता काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. इच्छुकांना संधी मिळावी यासाठी सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी फॉर्म विक्री सुरु केली आहे.

सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभेच्या जागेसाठी 20 हजार रुपयांत फॉर्म दिला जातोय. विधानसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत असताना जिल्हा काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय.5 ऑगस्टपर्यंत फॉर्म घेण्याचं आवाहन काँग्रेसनं(Congress) केलंय. सोलापुरातील कोणत्याही विधानसभेत तुम्ही काँग्रेसकडून इच्छुक असाल तर 20 हजार रुपये भरा आणि फॉर्म घेऊन जा. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकीकडे विधान सभेच्या जागेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या वाढत असताना काँग्रेसचा हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज मागवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खुल्या प्रवर्गातुन निवडुक लढविणाऱ्या इच्छुाकांना अर्जासाठी 20 हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 10 हजार रुपये भरून अर्ज घ्यावा लागणार लागणार आहे.(20 thousand rupees for application and 10 thousand rupees for reserved category.) इच्छुक उमेदवारांना 5 ऑगस्ट पर्यंत काँग्रेस भवन मधून फॉर्म घेऊन जाण्याचे आवाहन चेतन नरोटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी फोन नंबर
मुख्यमंत्री सहायता निधी फॉर्म pdf महाराष्ट्र
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे
मुख्यमंत्री सहायता निधी किती मिळतो
मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज
cmrf.maharashtra.gov.in hospital list
Mukhyamantri sahayata nidhi online application
पंतप्रधान सहाय्यता निधी