

नागपूर(Nagpur) – दहा वर्षात झालेले काम हे तर ट्रेलर आहे यापुढील काळात अधिक जोमाने देश प्रगती करणार आहे. संविधान बदलाच्या गोष्टी करून विरोधक संभ्रम निर्माण करीत आहेत, मात्र संविधान कोणीही बदलणार नाही. एका गरीब मातेचा मुलगा देशाचा पंतप्रधान झालेला विरोधकांना खपत नाही.महाराष्ट्रातील जनतेने एकही जागा विरोधकांना मिळू देऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी बुधवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातील जाहीर सभेत केले .
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान(Kanhan from Ramtek Lok Sabha Constituency) येथे नागपूरचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Union Minister Nitin Gadkari) भंडाराचे सुनील मेंढे तर रामटेक चे शिवसेना उमेदवार राजीव पारवे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मोदी बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार प्रफुल्ल पटेल खासदार अशोक चव्हाण खासदार कृपाल तुमाने माजी खासदार विकास महात्मे डॉक्टर दीपक सावंत मनीषा कायंदे आमदार आशिष जयस्वाल टेशन सावरकर आशिष देशमुख सागर मेघे असे अनेक आजी-माजी आमदार खासदार शिवसेना नेते उपस्थित होते .
मोदी पुढे म्हणाले,इंडिया आघाडी ताकदवान झाली तर ते देशाचे विभाजन करतील, हे लोक एका समाजाला दुसऱ्या समाजापासून तोडण्याचे काम करीत आहेत. पाचशे वर्षानंतर अयोध्येत त प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव भव्य स्वरूपात आता एका टेन्टमध्ये नव्हे तर भव्य मंदिरात साजरा होणार असून त्याचा नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला रामटेकच्या जनतेला आनंद होणार आहे.नवरात्र उत्सवाचे दिवस असल्याचा संदर्भ देताना शक्ती उपासनेच्या या पर्वात जे लोक हिंदू धर्माची शक्ती संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा लोकांना एकही सीट जिंकू देऊ नका त्यांच्या कर्माची शिक्षा द्या असे आवाहन मोदींनी केले. पाण्यावर काडी मारल्याने पाणी फाकत नाही तसाच गरिबाच्या मुलावर तुम्ही जितका हल्ला करेल तितका हा मोदी देश सेवेच्या संकल्पापासून मागे हटणार नाही.
एक गरीब मुलगा देशाचा पंतप्रधान झाला तर तो विरोधकांना डोळ्यात खूपच आहे. देशाच्या निवडणुकांचा इतिहास पाहता अटलजीपासून त्यांचा प्रत्येक वेळी संविधान धोक्यात असल्याचा पाढा होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही धोक्यात नव्हती का, चारी बाजूने तेच लोक निवडून येत होते तेव्हा हा धोका नव्हता का,आज एक गरीबाचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला तर त्यांना खपत नाही. मोदींना जितका विरोध वाढेल तितका मोदींचा जनाधार मजबूत होईल माझ्या मातापित्यांचा अवमान कराल,ईव्हीएम वर संशय उपस्थित कराल तर देशातील जनता भाजपला 400 पार नेल्याशिवाय राहणार नाही असा दावा त्यांनी केला. रामटेक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले ही भूमी राजे रघुजी भोसले यांची कर्मभूमी, बाबा जुमदेवजी, बख्त राजा बुलदंशाह,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दीक्षाभूमी याकडे लक्ष वेधत बाबा जुमदेवजी यांच्या व्यसनमुक्त कार्यक्रमाची प्रशंसा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनुष्यबाण आणि रामलीलाची मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रारंभी भेट दिली.
विदर्भातील दहा जागा महायुती जिंकणार -गडकरी विदर्भातील सर्व दहा जागांवर मोदींच्या नेतृत्वात महायुतीचा विजय होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिला. आता मेट्रो कन्हानपर्यंत येणार असल्याचे सांगितले. नागपूर शहर, जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. साठ वर्षात काँग्रेस जे करू शकली नाही ते दहा वर्षात मोदी सरकारने करून दाखवले.कुठल्याही योजनांमध्ये जातीभेद केला नाही याकडे लक्ष वेधले. विकासाच्या बाबतीत स्पर्धा करू शकत नसल्यानेच ते आता संविधान बदलाच्या गोष्टी करत आहेत, जनतेला संभ्रमित करत असल्याचा आरोप केला. कुणीही संविधानाचे मूलतत्त्व बदलू शकत नाही असे सांगत केशवानंद भारती प्रकरणाचा न्यायालयीन संदर्भ दिला. दुसरीकडे संविधान 80 वेळा तोडण्याचे काम काँग्रेसने केले. रामटेकला मी लवकरच रोपवे करणार असून हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ ते होणार आहे. जगभरातून लोक वाघ बघायला येतील तेव्हा रामटेकला येतील. शेतकरी समृद्ध करण्याचे काम आम्ही केले. शेतकरी ऊर्जादाता झाला नव्हे तर हवाई इंधन देखील तयार करीत आहे यावर गडकरींनी भर दिला.
मुख्यमंत्री म्हणाले,सर्वत्र मोदी लहर दरम्यान,देशभरात मोदींचा जयजयकार, मोदींची लहर असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले स्वराज्य,प्रभू श्रीरामाचे रामराज्य मोदीजी प्रत्यक्षात आणत असून घरी बसून विकास होत नाही. सत्तेसाठी केवळ विरोधक मोदी देशाने पछाडलेले आहेत. अंगात नाही बळ चिमटा काढून पळ अशी म्हणही त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता बोलून दाखविली. हाती चले बाजार, फेसबुक लाईव्ह करनाऱ्यांच्या तोंडाला फेस आला आहे .विरोधक जितका विरोध करतील तेव्हढयाच जोरदार एनडीए,भाजप सत्तेत येईल असा दावा केला.2019 ला विरोधी पक्ष देखील नेतेपद देखील त्यांना मिळू शकले नाही. 2024 च्या निकालात तर सर्व रेकॉर्ड मोदी तोडतील.जनतेनेच आता मोदींना चारशे पार करण्याची गॅरंटी घेतली आहे. एनडीएजवळ आत्मविश्वास आहे तर इंडिया आघाडीकडे अहंकार आहे. आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो तर अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. रामटेकच्या भूमीत विरोधकांचा अहंकार जनता जाळून टाकेल असा मला विश्वास आहे.सत्तेसाठी एकत्र साप मुंगसाच्या मैत्रीला जनताच घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला .
विकास व विरासत या दोन्ही गोष्टींना विरोध करण्याचे विरोधकांचे कारस्थान असून गोसीखुर्द महायुती, एनडीएच्या सरकारमध्येच मार्गी लागला. विकसित भारतासाठी शेतकरी मजबूत स्तंभ असून पाच वर्षात तेलबिया व भरड धान्यात देश आत्मनिर्भर करण्याचा आमचा संकल्प आहे. कधीकाळी 600 कोटींची डाळ खरेदी करणारे आपल्या राज्यातीलच कृषिमंत्री कोण होते हे आपल्याला माहिती आहे. आज ते देखील माझ्यावर आरोप करीत असल्याचे टीकास्त्र शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले.उलट आम्ही एक लाख 25 हजार कोटींचे डाळीची खरेदी केल्याचा दावा केला. विदर्भ रामायण, बुद्ध सर्किटच्या माध्यमातून पर्यटनात आमुलाग्र बदल होतील. समृद्धी महामार्ग विदर्भासाठी समृद्धी देणारा ठरेल.स्थिर सरकारच विकास करू शकतो हे तर ट्रेलर आहे येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला खरे काम दिसणार आहे तुमची स्वप्न हेच मोदीचा संकल्प आहे. प्रत्येक क्षण देशासाठी प्रत्येक क्षण आपल्यासाठी असे 24 बाय 7 काम केले तर 2047 साली देशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना विकसित भारत पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पंतप्रधानांनी दिला. येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक पोलिंग बूथ आपल्याला जिंकायचा आहे असे आवाहन केले.