

ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या छायाचित्र प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
नागपूर (Nagpur), १६ ऑगस्ट
‘फोटो काढणे ही एक कला आहे. भावना, कल्पना आणि परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे ही छायाचित्र असतात. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स जरी आले तरी फोटोग्राफरच्या कलात्मकतेला दुसरा पर्याय नाही. त्याच्या भावनांमधील आपलेपण छायाचित्रांमध्ये उतरते, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल (Commissioner of Police Dr. Ravindra Singhal) यांनी केले.
ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबतर्फे विश्व छायाचित्रण दिवस (19 ऑगस्ट)चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनीचे शुक्रवारी दर्डा आर्ट गॅलरीमध्ये डॉ. रविंद्र सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर व बंधन डिजिटल लॅबचे संचालक अबी बानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विष्णु मनोहर यांनी शुभेच्छा दिल्या तर लोकांच्या सुंदर आठवणी कैद करून ठेवण्यात आनंद असतो असे मत अबी बानी यांनी केले.
छायाचित्रकारांसाठी वाईल्ड लाइफ अँड नेचर, ट्रेव्हल अँड फेस्टीवल आणि वेडिंग या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेतील निवडक छायाचित्र येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन 19 ऑगस्टपर्यंत 11 ते 8 या वेळात सर्वांसाठी खुली राहील.
कार्यक्रमाचे संचालन राजन गुप्ता यांनी केले. ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लबचे अध्यक्ष गजानन रानडे, सचिव जयेश वसानी आणि कोषाध्यक्ष शब्बीर हुसेन, संयोजक डॉ. मैत्रिश्व व्यास, उपसंयोजक राजन गुप्ता, चेतन जोशी, पंकज गुप्ता यावेळी उपस्थित होते. जयेश वसानी यांनी आभार मानले.
फोटोग्राफी, व्हिडीयोग्राफी या विषयावर दररोज नि:शुल्क कार्यशाळा, चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले असून आलोक शेवडे, के. गणेश, समरेश अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विठोबा इंडस्ट्रीज प्रा. लि., बंधन डिजीटल लॅब, विको इंडस्ट्रीज, विशाखा ॲल्बम अँड फोटो बुक, के. गणेश एकेडमी, साई दृष्टी आय क्लिनिक, स्किन क्लिनिक, खरे अँड तारकुंडे, शॅडो फोटोग्राफी इंडिया प्रा. लि., पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री, वैष्णवी एल्बम मीडिया, मॅक्स मीडिया डिजिटल एल्बम, मिलिंद फ्रेम एंड प्रिंटिंग, स्व. बाबासाहेब नाहतकर स्मृति मे मोहन नाहतकर, श्याम एजेंसी, सौंदर्य संसार आणि सुमिता समीर कोलते यांचे सहकार्य लाभले आहे.
पुरस्कार विजेते
वाईल्ड लाईफ अँड नेचर या गटात ओमकार गाडगीळ, नाजिश अली, हिरा पंजाबी यानी प्रथम तीन क्रमांक पटकावले असून नलिनी चित्रदुर्गा, रवींद्र कांबळी, अनिकेत गुरव, शिबाशिश शहा यांना उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. ट्रॅव्हल अँड फेस्टिवल गटात शिवाजी धुते, हॅपी मुखर्जी, शिबाशिश शहा यांनी पहिले तीन तर उदय तेजस्वी, हिरा पंजाबी, शंतनू भोसे आणि सुधीर नजारे यांना उल्लेखनीय पुरस्कार पटकावले. वेडिंग गटात विशाल खरे, अनिकेत गुरव, आकाश गुप्ता यांनी प्रथम तीन तर वैभव काळमेघ, अक्षय येवागे, सुधीर पाटील आणि विधी भाकरे यांनी उल्लेखनीय पारितोषिक पटकावले आहे. कन्वेनर चॉईस पुरस्कार हा हर्षल गडीकर यांना मिळाला.