

चंद्रपुर(Chandrapur) २ जुलै :- जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान “स्टॉप डायरिया” अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवा. असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी जिल्हा स्तरीय शुभारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.
सविस्तर वृत्त असे, १ जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान “स्टॉप डायरिया” अभियान राबविण्याच्या शासनाचे निर्देश होते . त्यानुसार जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . या कार्यशाळेचे प्रास्ताविक मार्गदर्शक उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत(Nutan Sawant) यांनी केले. यावेळी मार्गदर्शक म्हणुन शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा फ़रेंद्र कुतीरकर, कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, चिमुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फ़ुलझेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, अतिसार मोहीमेत सर्वांनी सहभागी होणे गरजेचे असुन, तळागळातील जनतेला यामोहिमेत सहभागी झाले पाहीजे. बालमृत्युसाठी सर्वात पहिल कारण हे अतिसार आहे.
असे मत व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा फ़रेंद्र कुतीरकर यांनी अतिसार रोखण्यासाठी गावात अतिसार हा आजार होवु नये म्हणुन काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सर्व प्रथम सुरक्षित केले पाहीजे. स्त्रोतांच्या तपासण्या व त्यावर उपाय योजना काय होते. याविषयी यंत्रणेतील सर्वांनी जागृत राहील पाहीजे. चिमुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन फ़ुलझेले यांनी अतिसार थांबवण्याकरिता सर्वांगीन स्वच्छता महत्वाची आहे. याकरिता ग्रामस्थांनी जागृत राहव. वैयक्तिक स्वच्छते पासुन ते सार्वजनिक स्वच्छते पर्यंत सर्वांगीन स्वच्छता राखणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेत दुस-या भागात 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या गावात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामे योग्य पध्दतीने कशी करायची याविषयी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यात येणा-या अडचणी आवाहने याविषयी स्वच्छ भारत मिशनच्या स्वच्छता सल्लागार तृशांत शेंडे व पायल फ़टींग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा सल्लागार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागिय अभियंता, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंता,ग्रामसेवक,सरपंच, बीआरसी उपस्थित होते.सुत्र संचालन समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक यांनी केले.