किशोर जोरगेवार यांना मातृशोक

0

चंद्रपूर (Chandrapur), 20 ऑक्टोबर  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची आई गंगुबाई जोरगेवार “अम्मा” यांचे रविवारी सकाळी सव्वादहा वाजता चंद्रपुरात राहते घरी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या.

त्यांच्यावर २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून बिनबा गेट मार्गे अंतिमयात्रा निघून शांतिधाम येथे अंतिम संस्कार होणार आहेत.