

चंद्रपुर (Chandrapur) (प्रतिनिधी) दिनांक – 22/05/2025. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – 2 अंतर्गत जिल्हा परिषद येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा नुकताच पंचायत समिती स्तरावरी बीआरसी व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सल्लागार यांचा आढावा घेण्यात आला असुन, चंद्रपुर जिल्हा हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी गावस्तरावरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे वेळेत पुर्ण होणे आवश्यक आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावे हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास प्रथम प्राधान्य देवुन कामे करावे. असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी यत्रंणेला दिले.
आढावासभेत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय नळजोडणी , पाणी गुणवत्ता बाबत आढावा घेण्यात आला. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचे नियोजन करुन वेळेत पुर्ण करा, आवश्यक त्या लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ द्या, वेळापत्रकानुसार गावातील पाण्याच्या स्त्रोतांची वेळेत तपासणी करा, डबल्यु क्यु या एमआयएस वर माहीती भरल्या वरच पाणी नमुने प्रयोग शाळेत स्विकारावे, 15 जुन 2025 पुर्वी सर्व पाणी नमुण्याच्या तपासण्या पुर्ण कराव्या, मे 2025अखेर चंद्रपुर जिल्ह्यतील सर्व नळपाणी पुरवठा योजणांचे पाणी नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठवा. योजनेची सर्व कामे वेळेत पुर्ण करा.
अशा प्रकारच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी आढावा सभेत संबधीत यंत्रणेला दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी कार्यरत यंत्रणेतील सर्व कर्मचा-यांनी गुंणवत्ता पुर्ण कामे करुन जिल्ह्यातील गावे ओडीएफ़ मॉडेल कशी करता येईल. याबाबत आढाव्यात सुचना दिल्या.
आढावा सभेस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप बाराहाते ,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे सर्व जिल्हा सल्लागार, पंचायत समितीस्तरावरील गट समन्वयक, समुह समन्वयक व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सल्लागार , भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा प्रयोग शाळा चंद्रपुर यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा व तालुकास्तरावरील प्रयोग शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.