

तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे व रस्त्याच्या कडा पडल्याने रस्त्याने मार्गक्रमण करतांना किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तालुक्याला जोडणाऱ्या वाढा फॉर्म ते चांभई व अन्य भागातील रस्त्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी व रस्त्यावरील खड्डे तातडीने भरावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.
मंगरूळपीर तालुक्यातून दररोज शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, विद्यार्थी तालुका ठिकाणी दैनंदिन कामासाठी येतात. तसेच तालुका ठिकाणावरून अनेक विविध विभागाचे नोकरदार कामासाठी ग्रामीण भागातील ये-जा करतात. अनेक गावातील रस्त्यांची दुरावस्था असल्याने सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रोजच्या त्रास व असुरक्षीत प्रवासामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकार हायवे निर्माण करण्याकडे लक्ष करीत आहे. परंतू ग्रामीण भागातील रस्ते करण्यासाठी दुर्लक्ष करीत असून रस्त्याच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तालुक्याला जोडणाऱ्या गावांच्या रस्त्यांची परिस्थिती विदारक झाली आहे. याकडे संबंधित प्रशासनांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
संबधितांनी लक्ष देण्याची गरज
मंगरूळपीर तालुका ठिकाणावरून अनेक विविध विभागाचे नोकरदार कामासाठी ग्रामीण भागातून ये-जा करतात. अनेक गावातील रस्त्यांची दुरावस्था असल्याने सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रोजच्या त्रास व असुरक्षीत प्रवासामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत, याकडे शासन व प्रशासनाने लक्ष केंद्रीत करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी करावी व रस्त्यावरील खड्डे तातडीने भरावे, अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यातील वाढा ते चांभई व अन्य भागातील नागरिकांमधून होत आहे.