
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इतर पक्षांतून इनकमिंग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने त्यावर निर्णय घेण्यासाठी ८ पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत ही समिती निर्णय घेणार आहे. समितीत ४ केंद्रीय नेत्यांचा देखील समावेश आहे.
भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यात देखील एक समिती स्थापन होणार आहे. भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत समिती निर्णय घेणार आहे. या समितीच्या परवानगीनंतर बाहेरच्या नेत्यांना पक्षात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश घेणे आगामी काळात सोपे राहणार नाही, असे म्हटले जात आहे.