दीर-भावजयीने सोबत केली आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

0

अमरावती (Amravti) 11 ऑगस्ट
धारणीपासून जवळच्या असलेल्या गुलाई नावाच्या आदिवासी गावात दीर-वहिनीने सागाच्या झाडावर एकाच साडीच्या दोन टोकांची दोरी करून फाशी घेतल्याने एकच खळबळ माजलेली आहे. गुलाई गाव तापी नदीच्या पलीकडे असून या अफलातून प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची चर्चा मेळघाटात सुरू आहे.

तापी नदीच्या अलीकडे धारणी तालुका असून नदी पार मध्यप्रदेश सीमेतील गुलाई गावआहे. तीन दिवसापूर्वी मध्यप्रदेशातील खालवा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या गुलाई गावातील रहिवासी दिनेश काशीराम आणि त्याच्या भावजयीने एकाच झाडावर साडीच्या पदराच्या दोन टोकांना दोरी करून सोबतच फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. माहितीनुसार, दोघेही दीर-वहिनी चुलत असले तरी त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. दिनेशचे लग्न मागील महिन्यात झाले होते. मात्र, पत्नी त्याला सोडून माहेरी गेल्याचे समजते. तर दुसरीकडे मृतक महिलेचा पती महाराष्ट्रात कामाच्या निमित्ताने गेलेला आहे. होळी व दिवाळीलाच तो गावाला येत असतो.

खालवाचे ठाणेदार राठौर यांनी पंचनामा करून पुढील चौकशी सुरू केलेली आहे. जनचर्चेनुसार दोघांमध्ये प्रेम होते व एकमेकांप्रती आकर्षण पण खूप होते. मात्र कुटुंबीय व जवळचे नातेवाईक याबद्दल नेहमी आक्षेप घेत होते. अखेर दोघांनी सोबत जिवंत राहणे कठीण असल्याचे पाहून एकाच वेळी मरण्याचा निर्णय घेतलेला असावा.