सायबररेंज प्रयोगशाळेला महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी दिली भेट

0

जाणून घेतल्या सायबर सुरक्षा क्षेत्रात करियरच्या संधी

 

नागपूर(Nagpur), १० मे २०२४ – प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नुकतीच सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्ह सायबररेंज लॅब, सीताबर्डी येथे भेट देऊन सायबररेंज प्रयोगशाळेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

प्रा. पद्माने, डॉ. जोगो जॉन यांच्या नेतृत्वात प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या संगणक विज्ञान शाखेचे अंतिम वर्षाचे २६ विद्यार्थी आणि संगणक विज्ञान विभागाचे एचओडी डॉ. अभिषेक पाठक यांच्यासमवेत सेंट व्हिन्सेंट पलोट्टी महाविद्यालयातील 16 द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश होता.

सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्हचे (इंडिया) प्रा. लि. चे संचालक डॉ. विशाल लिचडे यांनी सायबर सुरक्षेतील करिअरच्या उज्ज्वल संधींवर भर दिला आणि विद्यार्थ्यांना त्याचा व्यवसाय म्हणून विचार करण्यास प्रोत्साहित केले. भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक पैलूंची व्यापक माहिती देण्यात आली, त्यात नोकरीच्या संधी आणि देशभरात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा व्यावसायिकांची वाढती मागणी या बद्दल देखील माहिती देण्यात आली. डॉ. विशाल लिचडे यांनी विद्यार्थ्यांना देशाची सेवा करण्यासाठी आणि भारतीय सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.