

नागपूर : भारतातील हवामानात सातत्याने बदल होत असून हिवाळ्यात पावसाळा असेच काहीसे चित्र गेल्या काही वर्षांत तयार झाले आहे. एकीकडे थंडीची लाट असताना, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडी तर दक्षिण भारतात पावसाची रिपरिप बघायला मिळत आहे. “वेस्टर्न डिस्टर्बन्स” मुळे हवामानावर सातत्याने परिणाम होत आहे.
दिल्ली, हरियाणा, पंजाब ही राज्ये दाट धुक्यात हरवली असून महाराष्ट्रातदेखील काही जिल्ह्यांवर कमीअधिक प्रमाणात धुक्याची चादर दिसून येत आहे. उत्तर भारतात नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही धुक्याची चादर अशीच कायम राहणार आहे. “वेस्टर्न डिस्टर्बन्स” चा परिणाम हवामानावर होत असून देशाच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.